Sunday, August 30, 2009

अधिक देखण्या मुली


अधिक देखण्या मुली। उपवर पाहणे
एवढेच विनवणे। तुला माझे वो माये ।।१।।
आजवरी छप्पन्न। पाहिल्या गे म्या पोरी
तेणे समाधान परी। होई ना वो माये ।।२।।
पसंत वधू करण्याची। नको घाई, येतील नक्की
अजुन चांगल्यापैकी। उद्याला वो माये ।।३।।
सुंदर आहे अगदी। इस्टेट असूनी
ऐसी मजला गुणी। नटी हवी वो माये ।।४।।
पुरे पुरे आता। चिकित्सा जास्तीची
स्थळे बंद यायची। जाहली वो माये ।।५।।
हल्ली लग्नबाजारी। अडलेल्या घोडवधू
डोळ्यांनी या अधू। म्या देखितो वो माये ।।६।।

0 comments:

About This Blog

Blog Archive

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP