Sunday, August 30, 2009

6

एका व्यापाऱ्याला एकदा सहा चिनी चिमण्या मिळाल्या. ‘राजासाठी किती छान भेट ही’ व्यापाऱ्याने विचार केला, पण महाराज अंधश्रद्धाळू असल्याचे त्यांचा शकुन-अपशकुनावर भारी विश्वास असल्याचे त्याला माहीत होते. त्याला वाटले ‘सहा’ हा आकडा राजाला आवडणार नाही. ‘सात’ या भाग्यशाली आकडय़ाची भरती व्हावी, म्हणून त्याने एक जपानी चिमणी घेऊन एका देखण्या सुबक पिंजऱ्यात पक्षी ठेवले आणि महाराजांना पिंजरा भेट दिला. असा दुर्मिळ नजराणा पाहून राजा खूश झाला. त्याने पक्ष्यांचे कौतुक केले आणि प्रत्येक पक्षी काळजीपूर्वक चौकसपणे पाहिला. हे जरा विचित्रच नाही का? काही वेळानं महाराज म्हणाले, ‘‘यातली एक चिमणी जपानी दिसत्येय.’’ व्यापाऱ्याला काय बोलावं सुचेना. त्याने घाबरून मान खाली घातली. ते पाहून जपानी चिमणीने आपली चोच उघडली आणि ती नम्रपणे म्हणाली, महाराज, ‘‘मी यांची दुभाषी नव्हे का?’’

0 comments:

About This Blog

Blog Archive

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP