Sunday, August 30, 2009

"कोंडी" ने केली पाकिस्तानची कोंडी : कार्टून ऑफ़ द डे

पाकिस्तान कडून पहिल्यापसुनाच अपेक्षा नव्हत्या. तसेच अमेरिका देखिल त्यांच्या फायद्यासाठी कोणती भूमिका घेईल याचा नेम नव्हता .अपेक्षेप्रमाने मुंबई मधे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधे पाकिस्तान सरकार ने "हात" वर केलेच, पण या हल्ल्यामधे फॉरेनर्स ना टारगेट केल्यामुले अमेरिका देखिल खडबडून जगी झाली आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान आता चांगलेच भोवर्यात सापडले आहे .आणि निर्र्लज्य पणे आमचा काहीही सम्बन्ध नाही असे बोलनार्या पाकिस्तान ने आता "ते दहशतवादी आमचेच " असे सूर आळवायला सुरवात केली आहे.

US Secretary of State Condoleezza Rice after visiting India, went to Pakistan and asked Pakistan to hand over the suspects. In Initial responce to India's demands, pakistan had not responded properly and even ruled out the links of terrorist attack to Pakistan. May be Pakistan Govt always faces pressure from extremist and ISI so they cannot openly accept all this. But now International pressure is making Pakistan to take action against Terrorist Camps.

Read more...

आता पाकला धडा शिकवलाच पाहिजे ....

दहशतवादाचा केंद्रबिंदु पाकिस्तान आहे हे आता पुन्हा पुन्हा सिद्ध करायची गरज नाही. पाकिस्तानच्या त्याच त्या टेप ऐकून एव्हाना सगळे जग बोर झाले असेल तरी पाकिस्तानी राजकारणी हा खेल थांबवायला तयार नाहीत. कारण त्यांचा बोलविता धनी कुणी दुसराच आहे .कमीत कमी शरीफ यांनी मान्य तरी केले की दहशतवादी पकिस्तानीच होते.

अमेरिकेवर जेंव्हा हल्ला झाला तेंव्हा त्यानी कुणाला विचारले ? तालीबान राजवट नष्ट करुन टाकली. आता भारतानेच पुढाकार घेवून हा प्रश्न सोडवला पाहिजे कारण सगळ्यात जास्त नुकसान भारताचे होत आहे. प्रत्येक भारतीयाला यापेक्ष्य दुसरे काही या घडीला तरी सूचने शक्य नाही. हे संकट आर्थिक संकटा पेक्ष्या मोठे आहे तेंव्हा एकदाचा प्रश्न सोडवून टाकूया .

Read more...

यांना कुणीतरी थांबवा !

अचुथानंदन, नक्वी आणि आता अंतुले...... लोकक्षोभाला कारणीभूत ठरणारी वक्तव्ये राजकारणी मुंबई च्या दहशतवादी हल्ल्या संबंधात करत आहेत. घराला आग लागली आहे पण यांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे .मुंबई च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून ओल्याच आहेत तोपर्यंत त्याचा वापर सोयीस्कर रीत्या राजकारणी करत आहेत याहून आपले दुर्दैव ते काय ?
अन्तुलेंनी आता कोलांटी उडी मारली आहे पण त्यांच्या वक्तव्याने जी मने दुखावली गेली आहेत त्याचे काय ? आधीच हताश झालेल्या पोलीस दलाच्या मानसिकतेचे काय ? देशाच्या सुरक्षा व्यवस्थे बद्दल असलेल्या लोकप्रतिनिधिंच्या संकल्पनांचे काय ? किती दिवस आपण हे "चलता है " म्हणत पुढे जाणार ?

Read more...

सत्यम सारखे घोटाळे होवू नयेत असे वाटते ?

मंदीच्या चटक्या मधे आधीच भाजून निघत असलेल्या आय टी मधील कर्मचार्याना सत्यम च्या रामलिंग राजूनी अजून खडयात ढकलले आहे. आर्थिक घोटाळया पेक्ष्या ही हे मोठे पाप आहे. स्वताच्या तुंबडया भरण्यासाठी हजारो कर्मचार्यांचा बळी देने योग्य नाही. राजूंच्या राजकीय संबंधां बद्दल आणि त्यांच्या 'लैंड बैंक ' बद्दल ऐकीवात आले, म्हणजेच हे शिस्तबद्ध रीत्या झाले आहे .
उद्योगपती कुटुंबियांचे वर्चस्व असलेल्या कम्पन्यां कड़े दुर्बिनितून बघायची वेळ आली आहे, नाहीतर सामान्यांचे असेच बळी जातील .



Read more...

पांढर पेशे चोर

अहो, ही बातमी आता गुन्हेगारी क्षेत्रात देखिल चर्चीली जावू लागली आहे..... काय चर्चा चालू आहे पहा ....

Read more...

लालू एक्सप्रेस

लालूनी आता कांग्रेस ची कास सोडून नवा रस्ता धरलाय ... त्यावरचे हे कार्टून

Read more...

बूट...

पायातल्या चपला कधी डोक्यावर घेवू नये म्हणतात पण पयातल्याच बुटानाच एवढे महत्व येईल असे कधीच वाटले नव्हते . अगदी जॉर्ज बुश पासून आपल्या स्टार पर्फ़ोर्मर चिदंबरम यांच्या पर्यंत सगळ्याना याचा प्रसाद खावा लागला .यावरच विषयावरच हे कार्टून ......

Read more...

भावी पंतप्रधान कोण ? केरीकेचर्स

या लोकसभेत कुणाला बहुमत मिळणार या बाबत कितीही वाद असले तरी सर्वानी आपले पंतप्रधान पदाचे उमेदवार आधीच ठरवून टाकलेत .काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून देखिल बसलेत .भविष्यात या राजकारणाला जो रंग यायचा तो येवू देत पण याच विषयाशी सम्बंधित काही राजकीय नेत्यांची केरीकेचर्स कशी जमलीत ते बघा ...









Read more...

शेर ऐ पंजाब ... व्यंगचित्र

भाजपच्या गोटातून होत असलेल्या "दुबळया" टीकेला अखेर मनमोहन सिंगनी उत्तर दिले. अगदी मार्मिक पणे इतिहासातील दाखले देत कोण दुबळे आहे ते सांगितले. याच विषयावर आम्ही थोड़े ब्रश स्ट्रोक्स चे सुख घेतले आणि हे कार्टून जन्माला आले ....

Read more...

रिसेशन ची चिंता आहे कुणाला ?

जागतिक मंदी, ले ऑफ़ या सगळ्यांचा फरक पडतो कुणाला ? तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना. या मंदीचे आजमितीस किती बळी झालेत कुणास ठावूक आणि पुढे काय वाढून ठेवले ते देखिल माहित नाही .या प्रश्नाने त्रस्त असलेल्या सगळ्या मित्रांना या व्यंगचित्राने हास्याचे दोन क्षण दिले तरी माझा प्रयत्न सार्थकी लागेल ...

Read more...

माया नगरी

मायावतीनी स्वताचे आणि कांशीराम यांचे पुतळे उभे करून जनतेच्या कल्याणासाठी असलेल्या पैशाची उधळपट्टी लावली आहे .मायावातींच्या याच "पुतळा " संस्कृति वर कार्टून

Read more...

गुजरात , विषारी दारू आणि मल्ल्या

गुजरातेत विषारी दारूच्या सेवानाने शेकडो लोकांचे बळी गेले ...
भ्रष्टाचार आणि कमकूवत प्रशासन ....
आणि त्यामधेही 'धंदा' बघणारे बिझनेसमन... यावर एक व्यंगचित्र

Read more...

भाजप च्या सद्यस्थिती वर व्यंगचित्र

भारतीय जनता पार्टी मधे जे सध्या अन्तर्गत वाद विवाद चालू आहेत या मधून काय निष्पन्न होईल माहीत नाही पण भाजपची सध्याची परिस्थिति रेखाटन्याचा केलेला हा प्रयत्न किती यशस्वी झाला ते मात्र तुम्ही जरुर सांगू शकाल

Read more...

तुमचा बॉस बेंच वर आहे का ?

मित्रानो सध्या आर्थिक मंदी .... काम नाही ... मग त्याला बॉस देखिल अपवाद कसा असणार ?
तुमचा बॉस बेंच वर आहे का ? नाही ? मग असे समाज की तो बेंच वर आहे आणि हे कार्टून पाहून खुदुखुदू हसा ! तेवढेच समाधान .
आणि जर खरच बॉस बेंच वर असेल ..... तर खो खो हसा हे कार्टून पाहून...

Read more...

आर्थिक निरर्थक संकट

जागतिक आर्थिक मंदी ,चलन वाढ , दिवसेंदिवस नीचांक गाठनारा शेअर बाजार, महागाई, बेरोजगारी..... अशा रोजच्या किरकिरिला वैतागलेल्या मित्रांसाठी याच विषयावरची कार्टून्स .....


राजकारणी कुठल्या विषयाचा वापर करतील याचा नेम नाही.
आणि आपली गरीब जनता ....







काही लोकाना नि

Read more...

चांदोमामा जवळ चांद्रयान


आपले मानव विरहित चांद्रयान चंद्राच्या कुशीत पोचले ।सर्व भारतीयांची मान उन्चावनारा हा क्षण .मर्यादित देशांच्या 'मून क्लब' मधे भारत जावून बसलाय. भारताच्या या पुढील चंद्र मोहिमामधे आता हुरूप येईल . विशेष म्हणजे या यानाचे सगळे कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण होत आहेत आणि इस्रो च्या शास्त्रज्ञांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे . आता "भारतीयाना वेळेची किंमत नाही" आणि "ब्रेन ड्रेन " या बद्दल बोलनारांची तोंडे बंद होतील ना ? मी बोअर करतोय का ? मग या चन्द्रयानाचा उद्देश संशोधन हा असला तरी या जोडप्याला काय चिंता लागलेली आहे पहा

Read more...

मॉल संस्कृती - एक गम्मत

बघता बघता इंग्लंड अमेरिके पर्यंत मर्यादित असणारी मॉल संस्कृती भारतात आली देखील .आता हे आपल्यासाठी चांगले की वाईट याचा जास्त विचार करण्या पेक्ष्या मॉल संस्कृतीच केलेला हा पंचनामा पहाणे जास्त सोपे आहे . तर मित्रानो मॉल संस्कृती म्हणजे काय ते पहा .




Read more...

लाईटस कँमेरा

इथे मी महाराष्ट्रा मधल्या काही प्रसिद्ध छोट्या तसेच मोठ्या पदाद्यावारिल आणि रंगभूमीं वरील व्यक्तिमात्वंची करीकँचर्स पोस्ट करत आहे

महाराष्ट्राला अनेक दशके हसविनारा अशोक सराफ
महाराष्ट्राचा लाड़का विनोदवीर - मकरंद अनासपुरे

Read more...

मराठी व्यंगचित्रे




Read more...

पोलिस - व्यंगचित्रे

पोलीस हा सामान्य माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक॰ पण पोलिसांच्या जीवनात कुणीच डोकावून बघत नाही ॰ त्यांच्या जीवनातील गमातीजमातीचा हा आलेख॰



Read more...

भारनियामानाचे फायदे

भारनियामानाचे फायदे ? त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आश्चर्य वाटेल ना ? महाराष्ट्राच्या पाचवीला जरी पुजलेले असले तरी काही लोकाना भारनियामानाचा फायदा झाला आहे तो असा.


प्राइम टाइम मधील भारनियमन सासु सुनेच्या सेरिअल्स जरी चुकवत असले तरी महिला वर्गाची अशी सोय मात्र झालीय


आणि सगळ्यात शेवटी ..... लग्नाचा हंगाम सुरु झाला असताना हा फायदा कुणीच नाकारु शकत नाही.

Read more...

जागतिक मंदी पासून गरिबांना वाचवा

नुकतीच कीमती कमी करण्याची अर्थमंत्र्यांची विनंती कॉरपोरेट जगाताने धुडकावून लावली. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी नुकतेच जाहीर केले की जागतिक मंदी पासून गरिबांना वाचवा.अमेरिकेत आतापर्यंत लट्ठ नफा कमावालेल्या कम्पन्याना वाचवान्याचे प्रकार चालले आहेत. सेंसेक्स आणि कॉरपोरेट जगताभोवती फिरनार्या अर्थव्यवस्थेचे समाजातील दुबल्या वर्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या व्यंगाचित्राची प्रेरणा यामधेच आहे. हे संकट लवकर दूर होवो हीच प्रार्थना .
कार्टून आवडले तर प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.

Read more...

तर कुत्रा देखिल.......

आपल्याकडेच मतांची भीक मागून खुर्चीवर बसलेल्यांच्या लेखी एका शहीदाच्या घरच्यांची ही किंमत, मग आपल्या सारख्या सामान्यांचे काय ? संदीप उन्नीकृष्णन हजारोलोकांचे प्राण वाचावान्यसाथीj अतिरेक्यांच्या गोल्याना समोर गेला आणि हे तथाकथित लोकाभिमुख पक्षांचे मुख्यमंत्री झेड सिक्यूरिटी च्या आडून अशी बेताल वक्तव्ये करतात.

अचुथानंदन यानी अखेर माफ़ी मागीतली पण त्यांच्यासाराख्या राजकरान्यानी आपल्याला अंतर्मुख करायला लावले. आपण कुणाच्या हातात सत्ता देतो ? आपण मतदान करताना या गोष्टीचा विचार करतो का ?
मुंबई करांच्या जखमा अजून ओल्या आहेत तोपर्यन्ताच राजकारान्यानी आपल्या बेताल वक्तव्याने त्या जखमेवर मीठ चोलले, गेटवे ऑफ़ इंडिया वर आलेल्या जनसागराने हे सिद्ध केले आहे की, आता पुरे जाले. आता बदल हवा.

आपण असेच अविचाराने मतदान करत राहिलो ...... तर कुत्रा देखिल खुर्चीवर बसेल ......

Read more...

2

Read more...

1

Read more...

1

इंटरव्ह्यूला जाताना फार तयारी करण्यात काही अर्थ नसतो. कारण इंटरव्ह्यू घेणारा नेहमीच जास्त तयारीत असतो.

Read more...

बी. एल. पकेट

आपल्या घरात जे आहे ते पुरेसे नाही, हे बायकांच्या मनावर ठसवणे, हे जाहिरातदारांचे मुख्य उद्दिष्ट असते

Read more...

फ्रॅंक सिनात्रा

सुख म्हणजे काय ते विवाह केल्याशिवाय कळत नाही. पण कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो.

Read more...

पुन्हा एकवार अ‍ॅपल

जन्मोजन्मीची ही कहाणी आहे. अगदी अनादिअनंत अशी. यात नेहमीचेच ते श्री. आणि सौ. आहेत. फार फार वर्षांपूर्वी ते अगदी दोघेच होते. खूप सुखात होते, पण एक बंधन होते. एक विशिष्ट फळ त्यांनी खायचे नव्हते. पण दुर्बुद्धी झाली. ते निषिद्ध फळ त्यांच्याकडून खाल्लेच गेले. ते फळ होते अ‍ॅपल. आणि झाले- आयुष्यात दु:ख यायला लागले. श्री. आपल्या सौ.ला म्हणाले- ‘उगाच मोहात पडलो. ते फळ आपण खाल्ल्यापासून किती Suffer करीत आहोत बघ. मला तर वाटते, मी आता ‘सफरचंद’ झालो आहे!’ सौ.ला श्रीं.ची ‘कोटी’ आवडली. म्हणाली- ‘वेल सेड! पण झालं ते झालं. उगाच मनाला लावून घेऊ नका. तब्येत खराब होईल. अशक्तपणा येईल- त्यापेक्षा छान खा, प्या! फ्रूटस् खा. विशेषत: अ‍ॅपल, कारण डॉक्टर म्हणतात- ‘अ‍ॅन अ‍ॅपल ए डे, कीप्स द डॉक्टर अवे!’
श्री. दचकले. म्हणाले- ‘परत ते अ‍ॅपल? एवढा घोळ झाल्यावरदेखील?’ सौ. चूप बसली. उगाच वादविवाद नको.
‘तोंडाला तोंड लावण्यात काय अर्थ आहे?’ तिने विचार केला. हुशार होती. तिला जाणीव होती की, ते निषिद्ध अ‍ॅपल खाल्ले, म्हणूनच त्यांची तोंडाला तोंडे लागली! आपल्या queer विनोदाचे तिला हसूच आले.
विषय बदलावा, म्हणून ती श्रींना म्हणाली- ‘नुसतं बिछान्यात पडून, आढय़ाकडे पाहत चिंता करणे किती ‘बोअर’ आहे नाही? मी असं करते, संध्याकाळी बाजारातून अ‍ॅपलचे आयपॉड आणते. तुम्ही छान छान गाणी ऐकत पडा!’ श्रींना अ‍ॅपल शब्दाचीच भीती वाटायला लागली होती. पण त्यांनी तसे दाखविले नाही. ‘आय विल फेस द म्युझिक!’ असे फिलॉसॉफिकली म्हणून ते गप्प राहिले. पण किती झाले तरी सौ. त्यांचीच ‘जीवश्च, कण्ठश्च’ होती. प्रेमाचा उमाळा राहवेना. शेवटी म्हणालेच तिला, ‘लाडके! तू माझ्याकरता किती करतेस! आय लव्ह यू! यू आर द अ‍ॅपल ऑफ माय आय!’’
श्रींच्या तोंडून ‘अ‍ॅपल’ शब्द ऐकून सौ. आश्चर्याने पाहू लागली. प्रेमाने ती श्रींना बिलगली. ‘असा साथीदार असताना एखाद्या पहिल्या चुकीची- ते अ‍ॅपल खाल्ल्याची एवढी काय भीती?’ असे तिला वाटू लागले. ती आणखीनच बिलगली.
..यथोचित समयी श्री. व सौं.ना मूल झाले. यथोचित समयी या नवीन पिढीच्या प्रतिनिधीला त्यांनी नर्सरीत टाकले. एक दिवस खूप कौतुकाने श्री. व सौ.ने आपल्या बंडय़ाला (किंवा बबलूला किंवा पप्पूला किंवा ‘मुण्डा’ला) विचारले- ‘आज शाळेत काय शिकविले राजा?’ त्याने उत्तर दिले- ‘आज टीचरने सांगितले- ‘ए फॉर अ‍ॅपल!..’ ’
आणि अशा रीतीने ही अ‍ॅपलची कहाणी चालूच आहे!. युगे.. युगे!

Read more...

मुख्यमंत्र्यांच्या दारात

Print E-mail
मुख्यमंत्र्यांच्या दारात सह्य़ाद्री उभा ठाकला.
पॅकेज नाहीतर सहावा आयोग द्या म्हणाला.
वर्षांनुवर्षे मोसमी वारे अडवितो.
‘ओटी’ न मांडता काम करतो.
वजन नसले तरी पावसाची फाईल पुढे सरकावतो.
तुम्ही तोडलेल्या झाडांमुळे कुडकुडत उभा राहतो.
माझी लाकडे तोडूनच तुमचं फर्निचर बनतं.
पर्यावरणाचं पासबुक ‘कोरं’ च राहतं.
वयोमानामुळं आता आजार सोसवत नाही.
महागाईमुळं हाता तोंडाची गाठ पडत नाही.
संपावर जाणं माझ्या स्वभावात बसत नाही.
नाक दाबल्याशिवाय तुमचं तोंड उघडत नाही.
सगळ्यांना देताय, मी काय घोडं मारलंय.
मागणाऱ्यांच्या बँकेत मीही खात उघडलंय.
‘उद्या या’ म्हणून कुणाला परत पाठवत नाही.
मागेल त्याला ‘एफएसआय’ वाढवून देत नाही.
शाळा, बागेचं रिझर्वेशन कधी उठवत नाही.
मुख्यमंत्री म्हणाले, मग तू माझ्या काय कामाचा.
तुझ्या सातबाऱ्यावर बोजा नाही युनियनचा.
उभ्या महाराष्ट्राला पगारवाढीचा ‘स्वाईन फ्ल्यू’ झाला.
पन्नाशीतच त्याच्या हातात वॉकर आला.

Read more...

प्रस्थापित

चिचुकेच मला खाताना वरणावर कळले होते
वमनाने केली सुटका पचनाने छळले होते।।
मी नव्हतो ‘उंच’ कधीही व्याख्येत पुरस्काराच्या
मी नाव तरीही तेथे हमखास घुसडले होते।।
जो नव्हता विषय कधीही माझ्या बुद्धीचा तरीही
मी नको तिथे तेव्हाही हे तोंड खुपसले होते।।
चावून चोथा झालेले माझे नेहमीचे रडगाणे
गावून येथे दुनियेला दररोजच पिडले होते।।
उत्तुंग पातळीवरचे कित्येक कवी ते होते
मी काडय़ा केल्यानंतर मागेच रखडले होते।।
ते गोड गुपित प्रतिभेचे मज कधीच कळले नाही
मी शब्द दुज्या कवितेचे चुपचाप पळवले होते।।
जन म्हणतील काय तयाची पर्वाच मी केली नाही
पैसा मोजून मी सारे सन्मान मिळवले होते।।
भेटला मला जो कोणी लेखक दमदार कसाचा
मी पुस्तक त्या व्यक्तीचे हलकेच उसवले होते।।
मी तारस्वराने माझी कविता खिंकाळत होतो
मी बसलो तेव्हा श्रोते सारेच उधळले होते।।

Read more...

अधिक देखण्या मुली


अधिक देखण्या मुली। उपवर पाहणे
एवढेच विनवणे। तुला माझे वो माये ।।१।।
आजवरी छप्पन्न। पाहिल्या गे म्या पोरी
तेणे समाधान परी। होई ना वो माये ।।२।।
पसंत वधू करण्याची। नको घाई, येतील नक्की
अजुन चांगल्यापैकी। उद्याला वो माये ।।३।।
सुंदर आहे अगदी। इस्टेट असूनी
ऐसी मजला गुणी। नटी हवी वो माये ।।४।।
पुरे पुरे आता। चिकित्सा जास्तीची
स्थळे बंद यायची। जाहली वो माये ।।५।।
हल्ली लग्नबाजारी। अडलेल्या घोडवधू
डोळ्यांनी या अधू। म्या देखितो वो माये ।।६।।

Read more...

रविवार, २३ ऑगस्ट २००९

रे मच्छरा मच्छरा
दुष्ट नाठाळ कुच्चरा
फिर फिर तू कितीही
चावू नको तू लेकरा
जरी लाड किती येवो
गोड गोबऱ्या गालाचा
पण तुला नाही हक्क
पापा घ्यायचा पिलाचा
जर केली तू जुर्रत
मारी एका चापटीत
वाहो किती तुझे खून
आहे आमचे ते रक्त
भूणभूण नको करू
चालता हो दिगंतरा
मुकशील रे जीवाला
ध्यानी ठेव तो खतरा

Read more...

1

Read more...

About This Blog

Blog Archive

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP