3
एकदा अब्राहम लिंकन एका गावी निघाले होते. चालत चालले होते. थोडय़ा वेळात पाठीमागून एक गाडीवान आला. त्याला थांबवत लिंकन यांनी त्यास विचारले,
‘कोठे निघाला आहेस बाबा?’
गाडीवानाने जायच्या ठिकाणाचे नाव सांगितले. लिंकनही तिकडेच निघाले होते. म्हणून त्यास म्हणाले, ‘‘मग माझा एवढा कोट घेऊन जातोस का?’’
‘‘नेतो की, त्यात काय एवढे ओझे! पण..’’
‘‘पण काय?’’
‘‘एक अडचण आहे.’’
‘‘कोणती?’’
‘‘तेथे गेल्यावर हा कोट मी कोणाला द्यायचा?’’
‘‘मग त्यात कसली अडचण!’’
‘‘म्हणजे?’’
‘‘मी कोटाच्या आत असणारच की?’’
0 comments:
Post a Comment