4
बीजगणिताचा तास चालू होता. शिक्षक एक सूत्र समजावून सांगत होते. ते असे- जर अ=ब; व ब=क असेल तर अ=क.
मुलांची प्रतिक्रिया पाहत, अजमावत त्यांनी एका मुलास विचारले, ‘‘मी जे आता सांगतोय ते तुला समजले का? एक उदाहरण सांग बघू.’’
थोडा विचार करून मुलाने उत्तर दिले.
‘‘मी माझ्या मैत्रिणीच्या वडिलांकडे गेलो व त्यांना म्हणालो, ‘‘बाबा, मी तुमच्यावर प्रेम करतो; नि तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता. याचा अर्थ- मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो.’’
0 comments:
Post a Comment