Sunday, August 30, 2009

5

बंडू अध्र्या तासापासून दारूचा ग्लास समोर ठेवून विचार करत बसला होता. तेवढय़ात त्याचा खास दोस्त खंडू तेथे आला. त्याने बंडूसमोरचा ग्लास उचलून तोंडाला लावला नि घटा घटा दारू पिऊन रिकामा करून खाली ठेवला. हे कृत्य बघून बंडू रडायलाच लागला.
खंडू कळवळला नि बंडूला म्हणाला ‘‘अरे, तू दारूचा ग्लास समोर ठेवून नुसताच बसला होतास म्हणून मी तो रिकामा करून टाकला. वाईट वाटून घेऊ नकोस. मी तुझ्यासाठी दुसरा ग्लास मागवतो.’’
बंडू आपले रडणे थांबवून खंडूला म्हणाला, ‘‘मेरे प्यारे दोस्त, तू दारूचा ग्लास रिकामा केलास त्यासाठी मी रडत नाही आहे. मी माझ्या दुर्दैवावर रडत आहे. आज माझ्या आयुष्यातला सर्वात खराब दिवस आहे. मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये उशिरा पोहोचलो. पण आज माझा बॉस चिडला नि त्याने मला नोकरीतून काढूनच टाकले. मी नव्‍‌र्हस झालो नि ऑफिसबाहेर आलो. आता काय करावे याचा विचार करत मी स्टँडजवळ आलो, पाहतो तर माझी स्कूटर चोरीला गेलेली. मी वैतागलो नि घरी आलो. दारूचा ग्लास भरून घेतला. त्यात विष ओतले नि जीव द्यायचा विचार करत होतो. एवढय़ात तू आलास नि माझा विष मिसळलेला दारूचा ग्लास रिकामा करून टाकलास. आत्महत्या करणे ही माझ्या नशिबात नाही रे! काय हे माझे दुर्दैव!’’

0 comments:

About This Blog

Blog Archive

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP